Hanuman Jayanti 2024 : कधी आहे हनुमान जयंती? बजरंगबलीच्या कृपेने ‘या’ लोकांचं नशीब चमकणार.

Hanuman Jayanti 2024 Date : श्री प्रभूचे परम भक्त… मंदिरात त्यांच्याशिवाय रामाची मूर्ती अपूर्ण मानली जाते असे हनुमानजी. यांची जयंती रामनवमीनंतर काही दिवसांमध्ये येते. पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते.

भारतात काही ठिकाणी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीलाही हनुमान जयंती साजरी करण्यात येते. अंजनी पुत्र हनुमानजी यांची जयंती तिथीला ग्रह आणि नक्षत्रांचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. अशा या हनुमान जयंतीची शुभ तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि कोणत्या राशींसाठी ही फलदायी आहे जाणून घ्या.हनुमान जयंती 2024 तारीख आणि

शुभ वेळ- चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी सुरुवात – 23 एप्रिलला पहाटे 3:25 वाजता चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची पौर्णिमा तिथी समाप्त – 24 एप्रिल पहाटे 5:18 वाजेपर्यंत. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार सण साजरे करण्यात येतात. त्यानुसार हनुमान जयंतीचा उत्साह हा 23 एप्रिलला साजरा करण्यात येणार आहे.

हनुमान जयंती पूजेचा शुभ मुहूर्त- पूजेची वेळ – 23 एप्रिलला सकाळी 9.03 ते 10.41 वाजेपर्यंत ब्रह्म मुहूर्त – 23 एप्रिलला सकाळी 4:20 ते 05:04 वाजेपर्यंत अभिजीत मुहूर्त – सकाळी 11:53 ते दुपारी 12:46 वाजेपर्यंतअंजनी पुत्र हनुमान मंत्र

कवच मूळ मंत्र- श्री हनुमते नम:

हनुमान जयंती येत्या 23 एप्रिल मंगळवारी साजरी करण्यात येणार आहे. हिंदू धर्मानुसार मंगळवार हा हनुमानजीचा पूजा वार मानला जातो. अशास्थितीत या हनुमान जयंतीचा दुहेरी योग जुळून आला आहे. यादिवशी चित्रा नक्षत्रात सिद्ध योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. तर मीन राशीमध्ये पंचग्रही योग निर्माण होणार आहे. याचा लाभ काही राशींच्या लोकांना मिळणार आहे. त्यात तुमची रास आहे का जाणून घ्या.

मेष राशी – या राशीच्या लोकांना हनुमान जयंती फलदायी सिद्ध होणार आहे. त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होणार असून व्यसायात फायदा होणार आहे. तुमचं बँक बॅलेन्स वाढणार आहे. बेरोजगारांना नवीन संधी मिळणार आहे.

मिथुन राशी- हनुमान जयंती या लोकांसाठी प्रगती आणि यश घेऊन आली आहे. जुन्या तणावासून तुम्हाला आराम मिळणार आहे. करिअर आणि व्यावसायात यश मिळणार आहे. आत्मविश्वास वाढणार असून आर्थिक स्थिती सुधारणार आहे.

वृश्चिक राशी- या लोकांसाठी हनुमान जयंती अतिशय लाभदायक ठरणार आहे. बिझनेसमध्ये चांगला नफा मिळणार आहे. भागीदारीमधील काम चांगल यश आणि प्रगती देणार आहे. करिअरमध्ये चांगली बातमी मिळणार आहे. कुटुंबात आनंदच आनंद असेल. त्यांच्या कामात प्रगती होणार आहे.

मकर राशी- या लोकांनावर बलजरंग बलीची कृपा बरसणमार आहे. तुम्हाला बिझनेसमध्ये सर्व बाजूने नफा मिळणार आहे. आयुष्यात आनंद आणि शांती लाभणार आहे. मुलांकडून प्रेम आणि आदर मिळणार आहे. कुटुंबात शुभ कार्य घडणार आहे. तुमचे अडकलेले पैसे परत मिळणार आहे.

कुंभ राशी- हनुमान जयंती कुंभ राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये यश घेऊन येणार आहे. नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. संपत्ती वाढ आणि व्यवसायात पैसे मिळणार आहे. नवीन व्यवसायासाठी चांगला काळ असेल. नातेवाईक आणि मित्रांकडून काही चांगली बातमीने तुमचं मन प्रसन्न असणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *