खरंच नजर लागते का? तळमळणाऱ्या लोकांचा शाप लागतो का?

तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अशी गुपितं असतात. तुम्ही एखाद्या वेळी एखाद काम करत असता, त्यावेळी ते दुसऱ्या व्यक्तीला बोलता. यानंतर असं होतं की ते काम होतच नाही. असं कधी झाले आहे का? कारण नजर लागली म्हणतात ना तसाच काहीसा प्रकार आपल्या कामाच्या बाबतीत होतो आणि आपलं होणार काम होत नाही. त्यामुळे आपण निराश होतो.

असा अनुभव अनेकदा आपल्याला येतोच. कारण आपण एखाद्या व्यक्तीला जवळचा आहे म्हणून अशी गोष्ट सांगत असतो.मात्र ती व्यक्ती मनातून तळमळत असते हे आपल्या लक्षात येत नाही.वरून गोड बोलणारी लोकं आतून जळत असतात.त्यामुळे आपली जी गोष्ट होणार आहे ती होतच नाही असे अनेकदा आपण पाहिले आहे.

ज्यावेळी तुम्ही एखादी गोष्ट करत असता ती पूर्ण झाल्याशिवाय कोणालाच याविषयी बोलू नका. ज्यावेळी ती पूर्ण होईल त्यावेळीही त्यांना सांगू नका. . तुम्ही ज्यावेळी यशस्वी व्हाल त्यावेळी त्यांना कळेल की तुम्ही काय आहात. कारण या जगात तुमचं चांगलं कुणालाच बघवत नाही, जवळच्याना तर नाहीच नाही..

केवळ तोंडावर हसून तुम्हाला चांगलं म्हणणारे लोक खूप आहेत मात्र माघारी तुमचे निंदा करणारे लोक खूप आहेत. दुसऱ्याचं चांगल झालेलं इतरांना बघवत नाही हाच दोष आहे. यासाठी स्वामी सांगतात तुझ दुःख तू कधीच कोणाला सांगू नकोस, तू जसा आहेस तसाच राहा. कारण या जगामध्ये ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा लोक ठेवत नाहीत. त्यामुळे तू कधीच स्वतःला ढासळू देऊ नको.

तू ज्यावेळी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करशील त्यावेळी त्या गोष्टीमुळे इतकी शांतता बाळग की कोणाला याची कल्पना नसली पाहिजे. कष्ट एवढ्या शांततेत कर की केवळ यशाचा आवाज घुमला पाहिजे. तोच आवाज दाहीदिशा घुमला पाहिजे. त्यावेळी विरोधकांच्याही डोक्यात प्रकाश पडला पाहिजे.

पण मित्रांनो एक गोष्ट नक्की की तुम्ही एखादी गोष्ट करताना इतरांशी त्याची चर्चा कधीच करू नका. नायतर होणारी गोष्ट कधी कधी थांबते असे आपल्याला दिसते. तुम्ही जास्त पैसे कमवत असाल आणि हे लोकांना ज्यावेळी कळते त्यावेळी लोक विचार करायला लागतात की हा आपल्यापेक्षा कमी असून याला एवढा पैसा कसा मिळतो. त्यावेळी मात्र कधीकधी आपल्याला असेच अनुभव येतात की यानंतर आपल्याला पैसे मिळणे कमी होऊ लागते.

याचं कारण हेच असते की नकारात्मक ऊर्जा तुमच्याविषयी नकारात्मक वातावरण तयार होते. आणि लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न असते ती होत नाही. त्यामुळे जोपर्यंत आपलं काम होत नाही तोपर्यंत कधीच कोणाला ते सांगू नका.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *