मकर राशीच्या लोकांनी एकदा नक्की वाचा…

आज आपण पाहणार आहोत मकर राशी विषयी, मकर राशीच्या भुवया ह्या जाड असून त्यावर दाट केस असतात.डोळे सुख आतल्या बाजूला असून खोलगट असतात.ह्यांची हनुवटी हे रेखीव असते आणि पुढे आलेली असते.म्हणजे हि राशी दिसायला एव्हढी सुंदर नसली तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी असते.म्हणजे पाहताच क्षणी हि व्यक्ती हुशार आणि आकर्षक वाटू लागते.ह्या राशीच्या लोकांचे बोलणे मुद्देसुत असते , ह्यांना मस्करी , मस्ती आवडत नाही.

जेवढे बोलायचे आहे तेवढेच बोलतात , बोलताना सुद्धा खूप अभ्यास करूनच बोलतात , त्यामुळे हे जे काही बोलतात ते समोरच्या व्यक्तीला पटते, या गोष्टीमुळे म्हणजे फक्त बोलण्यामुळे ह्या व्यक्ती समाजावर प्रभाव पाडू शकतात. मकर राशी हि चर स्वभावाची राशी आहे.चर स्वभाव म्हणजे हे मानसिक चंचल असतात , ह्यांना खूप गोष्टींमध्ये आवड असते.विविध क्षेत्रामध्ये हे लोक भाग घेत असतात.कोणते हि काम दिखावा म्हणून करत नाही किंवा कोणताही अहंकार ह्या राशीच्या लोकांकडे नसतो.

आपण केलेल्या कामाचे कौतुक स्वतः करत नाही आणि दुसऱ्यांना सांगत हि नाही म्हणून मकर राशीचे लोक जास्त समाजासमोर येत नाही. चर स्वभाव असल्याने जर भरपूर लोक एकत्र असतील तर ह्यांना काम करायला खूप उत्साह येतो. मकर राशी हि तमोगुणी राशी आहे , ह्या लोकांना शिळे अन्न खायला आवडते.जर हि लोक कधी उदास , निराश असतील तर सुस्त होऊ शकतात.मकर राशीचा स्वामी हा शनी आहे शनी असल्यामुळे ह्यांना उदासीनता येऊ शकते. शनी असल्यामुळे हि लोक रूढी प्रिय असतात म्हणजे देव धर्म , कुलाचार ह्या सर्व गोष्टींचे सुद्धा पालन करत असतात.

मकर राशीच्या लोकांना जुन्या गोष्टींची खूप आवड असते म्हणजे जुने शास्त्र किंवा विचार कसे स्वतःच्या जीवनात अंमल करता येईल ह्याचा विचार करत असतात. अनुभवातून शिकणे हा मकर राशीचा एक गुण आहे. राशी स्वामी शनी असल्याने हि लोक कर्णाचा हिशोब चांगला ठेवतात स्वतःच्या कर्मसोबतच जर कोणी समोरचा व्यक्ती चुकत असेल तर त्याला त्याची चूक दाखवून देतात.मकर राशीचे लोक समोरच्या व्यक्तीला खूप छान समजून घेतात आणि भावना जपतात. कुटुंबाची जबाबदारी किंवा सासू सासऱ्यांची एक मकर राशीची स्त्री खूप छान पार पडते.

मकर राशीच्या लोकांना स्वतःची मर्यादा ओलांडायला आवडत नाही.राशी स्वामी शनी असल्याने हि लोक त्यागी असतात म्हणजे दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःच्या गोष्टींचा त्याग करायला तयार असतात.खूप कष्ट करण्याची ह्या लोकांची तयारी असते , वरच्या पोस्ट वर जरी असले तरी खूप मेहनत करून हे लोक पुढे जातात.मकर राशी हि पृथ्वी तत्वाची राशी आहे.एकाग्रता खूप असते आणि कोणत्याही गोष्टीचे नियोजन हे स्थिर मानाने करू शकतात.

मकर राशीच्या लोकांना स्थिरता आवडते , जे चालू आहे नीट त्यामध्ये ते कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून रिस्क घेत नाही.मकर राशीचे चिन्ह हे एक सुसर आहे म्हणजे शरीर मगरी सारखे आहे,हा प्राणी जास्त सुस्त बसून असतो आणि हालचाली करत नाही. मकर राशीचा अंमल हा गुडघ्यांवर असतो त्यामुळे ह्यांना गुडघ्याचे किंवा संधी वाताचे आजार होऊ शकतात.

मकर राशी हि समाधानी राशी आहे त्यामुळे जास्त महत्वकांक्षा नसतात , खूप जास्त अपेक्षा सुद्धा करत नाही.मकर राशीचे लोक नाती तुटू नये म्हणून पडती बाजू सुद्धा घेतात. स्वाभिमानी पण असतात. मकर राशीचे लोक खूप नम्रपणे बोलतात , एकदम सेवाभावी वृत्ती असते . खूप निस्वार्थ पणे मेहनत करतात आणि दुसऱ्यांना मदत सुद्धा करतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले. ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अं ध श्र द्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं ध श्र द्धे चा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *