साप्ताहिक राशिफल: त्रिग्रही अद्भूत योगामुळे ‘या’ राशींना भरपूर लाभ.

22 ते 28 एप्रिल 2024 राशिफल: एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा हा आपल्यासाठी कसा असेल याबद्दल टॅरो कार्ड रीडर डॉ. कविता ओझा यांनी भाकीत केलंय. या आठवड्यात शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मेष राशीत सूर्य, शुक्र आणि गुरुचा त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. हनुमान जयंतीचा हा आठवडा कोणावर प्रसन्न होणार आहे जाणून घ्या.

मेष – टॅरो कार्ड्सनुसार मेष राशीच्या लोकांना या आठवड्यात प्रसिद्धीचा असणार आहे. या लोकांना आठवड्यात आनंद आणि आराम मिळणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रातील प्रगती होणार त्यामुळे तुम्ही समाधानी असणार आहात. आरोग्याची पूर्ण काळजी मात्र या आठवड्यात घ्या. तुमचे कौटुंबिक वातावरण आनंददायी असणार आहे.

वृषभ – टॅरो कार्ड्सनुसार या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला असणार आहे. हा आठवडा खरेदीसाठीही अनुकूल असल्याने तुम्ही खरेदीच्या मूडमध्ये असणार आहात. नवीन फायदेशीर संबंध निर्माण होणार आहे. अभ्यासासाठी वेळ उत्तम असणार आहे. शिक्षणातील अडथळे दूर होण्याचे संकेत आहेत.

मिथुन- या आठवड्यात तुम्हाला कामांमध्ये अडथळे येणार आहे, असे टॅरो कार्डचे गणित दर्शवित आहेत. या आठवड्यात मालमत्तेबाबत घेतलेल्या निर्णयांमुळे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. सहलीला जाण्यापूर्वी घरात योग्य सुरक्षा व्यवस्था करा नाही तर कोणाशीतरी वाद होऊ शकतात.

कर्क – टॅरो कार्ड्स गणितानुसार या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. वाहनाचे सुख तुम्हाला मिळणार आहे. आठव्या भावात शनि असल्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी खूप मेहनत करावी लागणार आहे. बाराव्या भावात सूर्य आणि बुध यांच्या भ्रमणामुळे खर्चात वाढ होणार आहे.

सिंह – टॅरो कार्ड्सनुसार या राशीच्या लोकांनी या आठवड्यात त्यांच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. नवीन नातेसंबंध सुरु करण्यासाठी हा आठवडा चांगला नाही. तर नोकरीत अपेक्षित बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. बचत करण्यात यशस्वी होणार आहात.

कन्या – टॅरो कार्ड सांगत आहेत की कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप फायदेशीर ठरणार आहे. या आठवड्यात अनेक चांगल्या संधी तुमच्याकडे चालून येणार आहे. नोकरीच्या ठिकाणी काही विशेष लाभ आणि नवीन संधी मिळणार आहे. तुम्हाला प्रियजनांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात येतो आहे.

तूळ – टॅरो कार्डनुसार तूळ राशीच्या लोकांसाठी दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे या सप्ताहात मार्गी लागणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात येणारे अडथळे दूर होणार असून अनुकूल काळ सुरु होणार आहे. उच्च अधिकारी तुमची क्षमता किंवा प्रतिभा तपासणार आहेत.

वृश्चिक – टॅरो कार्ड्सच्या गणेनुसार या आठवड्यात, वृश्चिक राशीच्या लोकांनी कामात आणि आरोग्याकडे लक्षकेंद्रित करायला हवं. लांबचा प्रवास टाळा. या आठवड्यात तुमचं मन अस्वस्थ असणार आहे त्यामुळे ध्यान करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

धनु – टॅरो कार्ड्सनुसार या आठवड्यात धनु राशीच्या लोकांचे प्रयत्न आणि सहकार्य तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. नवीन संबंध फायदेशीर ठरणार आहे आर्थिक योजना राबवल्या जाणार आहेत.

मकर – टॅरो कार्डनुसार मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात आता पर्यंत केलेल्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. मात्र आठव्या भावात सूर्य गोचरामुळे आत्मविश्वासाची कमतरता तुमच्यामध्ये दिसणार आहे. आरोग्य देखील थोडे नरमाई असणार आहे.

कुंभ – कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी खूप उत्तम असल्याचं टॅरो कार्डचे गणित दर्शवित आहे. व्यवसायात नवीन योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमच्याकडे पैशाचा सहज प्रवाह वाढणार आहे. अनियमितता आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.

मीन – टॅरो कार्ड्सनुसार मीन राशीचे लोक या आठवड्यात विरुद्ध लिंगाचे सहकारी तुमच्याकडे आकर्षित होणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी नवीन संधींमध्ये यश मिळणार आहे. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आर्थिक व्यवहार करताना सावध राहा अन्यथा मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *