Shadashtak Yog : कुंभ राशीत निर्माण होणार धोकादायक षडाष्टक योग! ‘या’ राशींना होणार धनहानी

Shadashtak Yog In Aquarius : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रहांपैकी शनि आणि राहू हे क्रूर ग्रह मानले जातात. शनि आणि राहूचं नाव घेतल्यावर भल्याभल्या माणसाला घाम फुटतो. शनि आणि राहुची दशा सुरु असलेल्या लोकांना अनेक संकटांच्या सामना करावा लागतो. अशात यावर्षी शनि आणि राहू अतिशय घातक असा योग निर्माण करणार आहे.

केतू हा पापी ग्रह वर्षभर मीन राशीत असणार आहे. तर कुंभ रासीत शनि विराजमान आहे. अशा स्थितीत कुंडलीत कुंभ रास आठव्या भावात असणार आहे. शनि आणि केतूमुळे षडाष्टक धोकादायक योग निर्माण होणार आहे. या अशुभ योगांच्या निर्मितीमुळे अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात एकामागोमाग संकट येणार आहे.

वृषभ रास – केतू आणि शनीच्या षडाष्टक योगाचा या राशीच्या लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम दिसून येणार आहे. या लोकांनी गाडी चालवताना थोडी काळजी घ्यावी अन्यथा अपघाताची शक्यता आहे. यासोबतच मानसिक तणावाचाही सामना या लोकांना करावा लागणार आहे. जर तुम्ही परदेशात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय व्यवहार करु नका. कारण तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. यासोबतच नात्यांबाबत थोडे सावध राहा अन्यथा त्यात मतभेद होऊन दुरावा निर्माण होईल.

कुंभ राशी- या राशीत केतू आठव्या भावात आणि शनि चढत्या घरात स्थित असणार आहे. अशा स्थितीत षडाष्टक योग या राशीच्या लोकांसाठी अडचणीचा ठरणार आहे. तुम्ही पैसे वाचवण्यात अयशस्वी होणार आहात. यासोबतच तुमच्या रागावर थोडं नियंत्रण ठेवा, कारण यामुळे तुम्हाला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागू शकतो. पैशाच्या बाबतीत थोडे सावध राहणे तुम्हाला संकटापासून वाचवेल. कोणताही व्यवहार विचारपूर्वक करा, कारण आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. यासोबतच विनाकारण कोणाशीही वाद घालू नका.

मीन राशी- केतू आणि शनीचा षडाष्टक योग या राशीच्या लोकांसाठी थोडा त्रासदायक ठरणार आहे. तुम्ही तुमच्या तब्येतीबद्दल थोडे चिंतेत राहावं लागणार आहे. कायदेशीर बाबींपासून दूर राहणे बरं पडेल. कारण कायदेशीर प्रक्रियेत तुम्ही अडकू शकता. वाहन चालव ताना विशेष काळजी घ्या. यासोबतच कुटुंबात सामंजस्य ठेवा, कारण काही कारणाने भांडणे होण्याची भीती आहे. यामुळे घरातील वातावरण अशांत होऊन तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *