षटतिला एकादशीला अनेक शुभ योगांचा संयोग! ‘या’ लोकांच्या तिजोरीत असणार लक्ष्मीचा वास

Shattila Ekadashi 2024 : हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला षटतिला एकादशी साजरी करण्यात येते. यंदा षटतिला एकादशी 6 फेब्रुवारीला असून या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहेत. एकादशी तिथी ही भगवान विष्णुला समर्पित असते. यादिवशी विष्णूदेवाला प्रसन्न करण्यासाठी तिळाचे उपाय केल्यास मोक्ष प्राप्ती मिळते असं म्हणतात. यादिवशी व्याघत योग, हर्ष योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांसह अनेक शुभ संयोग जुळून येत आहे. त्यात मंगळ देवाने मकर राशीत गोचर काही राशींसाठी षटतिला एकादशी भाग्यशाली सिद्ध होणार आहे.

मिथुन राशी- षटतिला एकादशीला जुळून आलेले शुभ योग हे या राशीच्या लोकांसाठी शुभ ठरणार आहे. या लोकांच्या धनसंपत्तीत घसघशीत वाढ होणार असल्याची शक्यता वैदिक ज्योतिषशास्त्रात वर्तविण्यात आली आहे. या दिवशी नवीन कामं सुरू करण्यासाठी शुभ आहे. तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होणार आहेत. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या अनेक संधी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळणार असून सर्व संकटांपासून मुक्ती मिळणार आहे.

सिंह राशी- देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ षटतिला एकादशीला होणार आहे. व्यवसायाची स्थिती या दिवशीपासून सुधारणार आहे. भौतिक सुखसोयी आणि संपत्तीत वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण असणार आहे. व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या भरपूर संधी मिळणार आहेत.

तूळ रास – या राशीच्या लोकांसाठी षटतिला एकादशीचा दिवस खूप शुभ सिद्ध होणार आहे. भगवान विष्णूच्या कृपेने वैवाहिक जीवनातील समस्या दूर होणार आहे. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येणार आहे. खडलेली कामं सुरू होणार आहेत. नोकरदारांना बढतीची संधी मिळणार आहेत. व्यवसायात लाभ होणार आहे. हा एक शुभ काळ तुमच्यासाठी सिद्ध होणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *