साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य, 05 ते 11 फेब्रु. 2024 महादेव ‘या’ राशींना करणार मालमाल!

Weekly Career Horoscope 05 to 11 February 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सोमवारी 5 फेब्रुवारीला मंगळ मकर राशीत रात्री 9:07 वाजता गोचर करणार आहे. मंगळदेवाच्या संक्रमणामुळे काही राशींना फायदा होणार आहे. साहस, पराक्रम, शौर्य आणि करिअरचा कारक मंगळाच्या राशी परिवर्तनामुळे काही राशींना धनलाभ होणार आहे. हा आठवडा मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असणार आहे जाणून घ्या.

मेष राशी- या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या ठिकाणी प्रगतीचा असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. कुटुंबात आनंद आणि सौहार्द आणि परस्पर प्रेमाच वातावरण असणार आहे. आरोग्यामध्येही चांगले परिणाम दिसून येणार आहेत. या आठवड्यात तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत प्रवासाला जाणार आहात. या आठवड्यात आर्थिक खर्च अधिक असणार आहे. शुभ दिवस : ६,७,८

वृषभ राशी- या राशीच्या लोकांसाठी कामाच्या ठिकाणी प्रगतीचा हा आठवडा असणार आहे. तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्याही सोपवल्या जाणार आहेत. आर्थिक बाबतीत सुधारणा होणार आहेत. कोणतीही नवीन गुंतवणूक तुमच्यासाठी शुभ असणार आहे. तुम्ही कुटुंबासोबत आनंददायी वेळ व्यतित करणार आहात. घराच्या सजावटीसाठी काही खरेदीही तुम्ही करणार आहात. या आठवड्यात तुम्हाला प्रवासात मध्यम यश प्राप्त होईल. तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत थोड नरमगरम वाटणार आहे. शुभ दिवस : ३,४,५,७

मिथुन राशी- या राशीच्या लोकांना हा आठवडा त्यांच्या कामात यश मिळवून देणार आहे. त्यामुळे तुम्ही समाधानी असणार आहात. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असणार आहे. या आठवड्यापासून तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळणार आहेत. कुटुंबात सुख-समृद्धीसाठी शुभ संयोग जुळून येत आहेत. या आठवड्यात केलेल्या प्रवासातूनही यश मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी, कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून निराशा वाढण्याची शक्यता आहे. शुभ दिवस: ३,४,५,७,८

कर्क राशी- या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रवासातून यश संपादित करण्याचा आहे. तुमचा प्रवास यशस्वी होण्यासाठी ज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे अशा व्यक्तीकडून तुम्हाला मदत मिळणार आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचा आशीर्वाद वाढेल आणि कुटुंबात परस्पर प्रेम वाढणार आहे. या आठवड्यात तुमचे आरोग्य सुधारणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात कठोर परिश्रम करून तुम्हाला शुभ परिणाम दिसून येणार आहेत. शुभ दिवस: ६,७,८,९

सिंह राशी- आर्थिक बाबींसाठी हा आठवडा तुमच्यासाठी शुभ असणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. या आठवड्यात तुम्ही कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करुन निर्णय घेणं तुमच्यासाठी फायद्याच ठरेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एकटेपणा वाटणार आहे. तर कुटुंबात कोणी लक्ष देत नाही असंच तुम्हाला वाटणार आहे. या आठवड्यात प्रवास पुढे ढकलल्यास चांगले परिणाम दिसणार आहेत. सप्ताहाच्या शेवटी काही राजवाड्याच्या मदतीने जीवनात सुख-समृद्धी वाढणार आहे. शुभ दिवस : ५,९

कन्या राशी- या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा त्यांच्या प्रोजेक्टशी संबंधित काही चांगली बातमी घेऊन आला आहे. आर्थिक बाबींमध्ये संयम ठेवल्यास चांगले परिणाम दिसून येणार आहेत. तुम्हाला पैसे मिळणार कुठून तरी मिळणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासाचे शुभ फळ तुम्हाला लाभणार आहे. तुमच्यापैकी काही जण मुलांच्या आरोग्याबाबत अधिक काळजीत पडणार आहेत. आठवड्याच्या शेवटी तुमचा वेळ आनंददायी जाणार आहे. शुभ दिवस : ५,८

तूळ राशी- या राशीच्या लोकांनी संयम ठेवून कोणताही निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. या आठवड्यात तुमच्या तब्येतीत बरीच सुधारणा होणार आहे. तुम्हाला निरोगी वाटणार आहे. आर्थिक बाबींमध्ये भावनिक कारणांमुळे खर्च जास्त होणार आहे. कामाच्या ठिकाणीही तुम्ही एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीबद्दल अधिक काळजी वाटणार आहे. तुमचा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी, तुम्ही वाटाघाटीद्वारे समस्या सोडवल्यास ते अधिक फायदेशीर ठरेल. या आठवड्यात केलेल्या प्रवासात मध्यम यश देणार आहे. आठवड्याच्या शेवटी काळ थोडा कठीण असणार आहे. शुभ दिवस: 6,7

वृश्चिक राशी- या राशीचे लोक नवीन प्रोजेक्ट मिळाल्याने आनंदी असणार आहेत. व्यावसायिक सहली तुम्हाला आनंददायी वातावरण देणार आहे. आर्थिक बाबींसाठीही हा काळ शुभ असून गुंतवणुकीतून अतिशय फायदेशीर आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासाचे शुभ फळ देणार आहे. तुम्हाला नवीन ठिकाणी प्रवास तुमच्यासाठी दिशा बदलणारा असणार आहे. यावेळी तुम्ही कोणताही महत्त्वाचा निर्णय पुढे ढकलल्यास चांगले परिणाम दिसणार आहेत. शुभ दिवस : ५,६,८

धनु राशी- या लोकांना तुम्हाला काही चांगली बातमी मिळणार आहे. तरुणांकडून पूर्ण सहकार्य मिळणार आहे. तुमचा प्रकल्प यशाच्या मार्गावर पुढे जाणार आहे. या आठवड्यात आर्थिक खर्च जास्त होणार असून त्याकडे लक्ष द्या. या आठवड्यात केलेले प्रवास सुखद अनुभव देणार आहे. तब्येत हळूहळू सुधारणा होणार असून आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखाद्या वृद्ध व्यक्तीबद्दल चिंता वाटणार आहे. शुभ दिवस : ५,८

मकर राशी- मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या ठिकाणी प्रगती आणि यशाचा असणार आहे. तुम्हाला दोन महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करायच आहे. या आठवड्यात तुमच्या कुटुंबासमवेत आनंद आणि समृद्धी घरात नांदणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सहवासात आनंददायी क्षण व्यतित करणार आहात. प्रवासात यश मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या बाजूने अधिक मेहनत करण्यावाचून पर्याय नसणार आहे. आर्थिक खर्चही जास्त होणार आहे. प्रेम जीवनात आनंद दार ठोठवणार आहे. शुभ दिवस : ७,९

कुंभ राशी- या राशीच्या लोकांना या आठवड्यात महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. कार्यक्षेत्रात हुशारीने काम करणं तुमच्या हिताच ठरेल. आर्थिक बाबींमध्ये खर्च वाढणार आहे. किंवा प्रवासामुळे खर्च वाढणार आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. पोटाशी संबंधित समस्या त्रासदायक ठरणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या कुटुंबातील तरुण व्यक्तीबद्दल चिंतेत असणार आहात. या आठवड्यात तुम्ही सहली पुढे ढकलल्यास चांगले परिणाम मिळतील. शुभ दिवस : ५,७

मीन राशी- मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत शुभ ठरणार आहे. तुमच्या अपेक्षेपेक्षा कमी असले तरी आर्थिक लाभ होणार आहे. या आठवड्यात आरामात प्रवास केल्यास उत्तम ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला असमाधान वाटू शकतं. कौटुंबिक बाबींमध्येही आळस वाढणार आहे. शुभ दिवस: 5,6

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *